Author(s): प्रा. विद्या प्र. गावंडे
प्रस्तावना: सर्व कलांमध्ये श्रेष्ठ अशी संगीतकला समजली जाते. संगीत हे मनोरंजनाचे साधन आहे. संगीत क्षेत्रात अनेक जेष्ठ कलावंताचे योगदान लाभले आहे. सरस्वती राणे यांचे सूध्दा सांगीतिक योगदान अमूल्य आहे. सरस्वती राणे या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. त्यांनी हिंदूस्तानी शास्त्रीय संगीताप्रमाणेच मराठी, हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायण, भावगीत, नाट्यगीत तसेच संगीत रंगभूमीवर अभिनय असे विविधांगी कर्तृत्व त्यांच्या अंगी होते. सरस्वती राणे यांचा जन्म मिरज येथे अब्दूल करीम खाँ व ताराबाई माने या दाम्पत्यांच्या पोटी झाला. सूरेश बाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांची त्या धाकटी बहीण होत. सरस्वती राणे यांचे मूळ नाव सकीना होते. घरात त्यांना लाडाने छोटूताई म्हणत होते. सरस्वती यांचे सूंदरराव राणे यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांना सौ. सरस्वती राणे म्हणून ओळखू लागले.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.109
Download Full Article from below:
सरस्वती राणे यांचे सांगीतिक योगदान
Pages:560-563