Author(s): डॉ. सुजाता नाईक
प्रास्ताविक: भारतात पुरुष प्रधान संस्कृती आहे त्यामुळे पुरातन काळापासून स्त्रीला दुय्यम स्थान दिले गेले आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यात नेहमीच फरक केला गेला आहे. शतकानुशतके स्त्री-पुरुष यांच्यामधील फरकाची व्याख्या सामाजिक पद्धतीने केली गेली आहे. ती लैंगिकतेच्या दृष्टीकोनातून केल्याचे दिसून येते. त्यामुळे ती विकृत पद्धतीने केल्याचे दिसते. ही फरकाची व्याख्या करतांना पुरुष वरचढ ठरवला गेला. दुर्दैवाने हा वरचढपणा कायमच राहिला आहे.
समाज निर्मितीच्या प्रक्रियेत स्त्री-पुरुष यांना महत्वाचे स्थान व मूल्य आहे. पण प्रत्यक्षात समाजव्यवस्थेत त्यांच्या जगण्याच्या संधीत व जीवनाच्या विविध पातळीवर विषमता दिसून येते. परिणामी लिंगाधारीत विषम सामाजिक चौकट तयार झाल्याने त्यातून पुरुषप्रधान संस्कृतीला अधिष्ठान प्राप्त झाले. त्याचा विपरीत परिणाम स्त्रियांच्या सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक जीवनावर होतांना दिसत आहे. परिणामी स्त्रियांच्या वाट्याला सामाजिक व कौटुंबिक व्यवस्थेत दुय्यमत्व प्राप्त झाले. त्यामुळे विकासाच्या संधी नाकारण्यात आल्या त्यामुळे कौटुंबिक विकास एकांगी झाल्याने समाज व देशाचे अपरिमित नुकसान झालेले आहे.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.106
Download Full Article from below:
भारतीय स्त्रियांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान
Pages:549-553