Author(s): प्रा. विनोद जे. राठोड
सारांश: संयुक्त राष्ट्र संघटनेची मानवी हक्क सनद व विविध देशाच्या राज्यघटनेमार्फत पुरुषाबरोबर महिलांना समानतेचे अधिकार व समान संधी देणारे अनेक कायदे कलमे अमलात आणल्या गेली. महिलांवरील अन्याय , अत्याचार संपुष्टात आणण्यासाठी , महिलांना सक्षम बनविण्यासाठी शासकीय स्तरावर विविध धोरणांची अंमलबजावणी करण्यात आली. महिलांना आर्थिक , शैक्षणिक, राजकीय दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी अनेक मार्गाने प्रयत्न झाले व सुरू आहे. परंतु उपरोक्त सर्व प्रयत्नामुळे महिलांवरील अन्याय, अत्याचार ,शोषणातील परिमाण व परिणामांमध्ये फारसा फरक दिसत नाही. वर्तमानपत्रे, दूरदर्शन तसेच इतर प्रचार -प्रसार माध्यमाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास महिला अन्याय, अत्याचाराच्या असंख्य घटना घडताना दिसतात. अप्रगट घटनेची संख्या यापेक्षा फार जास्त असू शकते. महिला शोषणासंबंधित घटना आज नियमितपणे व राजरोसपणे चालू आहे. यासाठी महिला मानवी हक्क संरक्षण व सक्षमीकरणासंबंधित कायदे अमलात आणणारी यंत्रणेची प्रभावहीन कामगिरी व पुरुषप्रधान मानसिकता मुख्यत्वे करून जबाबदार आहे. जोपर्यंत खुल्या दिल्याने, अंतर्मनाने प्रत्येक कुटुंबात, समाजात, देशात स्त्री -पुरुष समानतेची मानसिकता, भावना निर्माण होणार नाही, ती अमलात येणार नाही ,स्त्रियाकडे बघण्याच्या नकारात्मक मानसिकतेमध्ये बदल होणार नाही, स्त्रियांना आवश्यक तेवढे स्वातंत्र्य दिल्या जाणार नाही, महिला सक्षमीकरणासाठी उपाययोजनात्मक कार्यवाहीची प्रभावीपणे अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत महिलांचे शोषण कमी -अधिक प्रमाणात नियमितपणे सुरू राहणार आहे.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.95
Download Full Article from below:
मानवी हक्क आणि महिलांचे शोषण
Pages:493-495