Author(s): कु. वर्षा काशीराम रोठे१, प्रा. डॉ. नीलिमा सरप२
सारांश: प्रस्तुत शोधनिबंधातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील महिला वाहकांच्या आव्हानात्मक कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रमाणिक प्रयत्न करण्यात आलेला आहे. कोणतेही चांगले कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्याचप्रमाणे एखादी नोकरी किंवा व्यवसाय यामध्ये जर आपल्याला टिकून राहायचे असेल तर त्यात सुद्धा बऱ्याच अडचणींचा सामना त्या व्यक्तीला करावा लागतो. म्हणजेच यशापर्यंत पोहोचण्यासाठी व्यक्तीला अनेक अपयशांचा सामना करावा लागतो, अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील महिला वाहकाची जी नोकरी आहे ती काही अंशी अशाच स्वरूपाची आहे. ती नोकरी करत असताना महिला वाहकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. तसे पाहिले तर वाहकही पुरुषांचीच नोकरी आहे परंतु झपाट्याने वाढत असलेल्या औद्योगीकरणाच्या परिणामामुळे सगळीकडे बेरोजगारीचे सावट निर्माण झाले. त्यामुळे महिलांना हव्या असलेल्या नोकऱ्या काबीज करता आल्या नाही अशा महिलांनी नाईलाजाने महिला वाहकाची नोकरी स्वीकारली. मग त्यात कितीही संकटे आली तरी ती नोकरी त्यांना टिकवायची आहे म्हणून महिला वाहक ही आपली नोकरी टिकवण्यासाठी धडपड करत आहेत, आलेल्या संकटांना राजीखुशीने सामोरे जात आहेत. यावरून त्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे की, महिला कोणते ही कार्य हिरारीने करून त्यातील संकटांवर मात करून ते पूर्णत्वास नेत असतात.
बीज शब्द: महिलावाहक, नोकरी, आव्हान, सक्षमीकरण, संयम, महत्त्वाकांक्षा.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.94
Download Full Article from below:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील महिला वाहकांची नोकरी : एक आव्हान
Pages:489-492