Author(s): रूपाली सुभाषराव कणसे
सारांश: बालक ही राष्ट्राची मौलिक मानवी साधन संपत्ती आहे. त्यावरच राष्ट्राचे भविष्य अवलंबून आहे. महिला व बालकांच्या विकासासाठी शासनाच्या आणि सेवाभावी संस्थांच्या आणि निरनिराळ्या यंत्रणाच्या वतीने बहुविध योजना कार्यान्वित केल्या गेल्या आहे. परंतु विविध कारणांमुळे त्या योजना ज्यांच्यासाठी तयार केल्या जातात त्यांच्यापर्यंत त्या पोहोचत नाही किंवा अंशतः पोहोचतात म्हणून आजही देशातील एकूण लोकसंख्येपैकी 25% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहे. याचा गंभीर परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. इतर देशाच्या तुलनेत आजही भारतामध्ये बालमृत्यूचे प्रमाण आढळून येते. मुलांच्या विकासात पोषक आहाराची महत्त्वपूर्ण स्थान आहे. भारतातील साधारणता लोकसंख्या निम्न आर्थिक स्तरात आढळते त्यामुळे आर्थिक दृष्ट्या मागासलेली कुटुंब भारतात अधिक प्रमाणात आहे अशा कुटुंबातील व्यक्तींना, मुलांना पुरेशा प्रमाणात पोषक आहार व पोषक तत्वाचा पुरवठा होत नसल्याचे मुख्य कारण भारतातील दारिद्र्याची समस्या होय. ही कुपोषणाची समस्या अवघ्या जगासाठी एक आव्हान असल्याचा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. देशासाठी सशक्त व सुदृढ पिढी निर्माण करण्याच्या उद्देशाने अभ्यासाकरिता या विषयाची निवड करण्यात आली.
बीज शब्द: आरोग्य, पोषण, पोषक घटक ,पोषण जागरूकता ,समतोल आहारप्रस्तुत अभ्यासाची उद्दिष्टे
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.93
Download Full Article from below:
पोषक आहाराबाबतची जागृकता
Pages:484-488