Author(s): राजू शरदराव चव्हाण
प्रस्तावना: आज एकविसाव्या शतकातही भारतीय स्त्रियांना अनेक प्रकारच्या गंभीर समस्यांशी झुंज द्यावी लागत आहे. भारतीय पुरूषांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोण अजुनही पुरेसा निकोप नाही, स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते असे नव्हे तर त्यांच्यावर विविध प्रकारचे अत्याचार केले जातात. हा अत्याचार शारीरिक, मानसिक, वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक स्वरूपाचा असून त्याची व्याप्ती अतिशय मोठी आहे. भारतीय स्त्रियांची सामाजिक स्थिती अनेक स्थित्यंतरातून गेली असून तिने पुष्कळ चढ-उतार पाहिले आहेत. वैदिक काळात त्यांची देवता म्हणून पूजा होत असे. मुस्लिम काळात त्यांचा दर्जा अगदीच खालावला तर ब्रिटीश राजवटीत त्यांना गुलामांचे गुलाम म्हणून पाहिले जाई. पारंपारीक भारतीय समाजात अशा अनेक धार्मिक व सामाजिक प्रथा रूढ होत्या की, ज्यामुळे स्त्रियांना अत्यंत तुच्छ लेखण्याची मानसिकता येथे तयार झाली होती. सतीची चाल, स्त्री-भृणहत्या, बालविवाह, बहु–पत्नीविवाह, केशवपन यासारख्या चालीरीती व रूढींचा स्त्रियांच्या जीवनावर विपरीत परिणाम घडून आलेला होता.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.91
Download Full Article from below:
स्त्री अत्याचार: एक सामाजिक समस्या, आव्हाने आणि उपाय
Pages:474-476