Author(s): प्रा. एस. एस. तायडे
प्रस्तावना: महिला सक्षमीकरण हा विषय आजच्या काळामध्ये अतिशय महत्वाचा असून तो आवश्यक आहे. कारण भारतीय समाजातच नाही तर संपूर्ण जगामध्ये महिला हया दुर्बल घटक म्हणून संख्येने अधिक आहेत. नैसर्गिक दृष्ट्या स्त्रिया हया पुरुषाच्या इतक्यात सामर्थ्यवान व सक्षम आहेत आणि आधुनिक काळामध्ये संपूर्ण देशाच्या कायद्यानेही मान्य करून त्यांना सर्वच क्षेत्रात समान संधी निर्माण केल्या आहेत. तरीहीपण महिलासमोरील समस्या. अडचणी कमी झाल्या नाहीत म्हणून आजच्या काळात "महिला सक्षमीकरण" हा विषय सर्वच क्षेत्रात महत्वाचा मानला जातो. चर्चासत्र, परिषदा, वर्तमानपत्रे यामधून त्यावर विचार व्यक्त केले जात आहेत. महिला हया सामाजिक व सांस्कृति साखळीतून मुक्त होऊन त्या पुरूषाच्या सोबत समानतेच्या आधारावर जीवन जगू शकल्या पाहिजे व त्यांची सर्वच क्षेत्रात उन्नती, प्रगती होवून महिला हया आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैचारिक, धार्मिक राजकीय इत्यादी बाबतीत सक्षम होवून समान तत्वावर कार्य करू शकल्या पाहिजे तेव्हा त्यांचे सक्षमीकरण झाले आहे असे म्हणता येईल.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.86
Download Full Article from below:
महीला सशक्तीकरण कायदेविषयक तरतूदी आणि मानवतावाद
Pages:444-446