Author(s): प्रा. सुमेध अ. कावळे
सारांश: सामाजिक संस्कृतीच्या इतिहासाचा भारतीय समाजाच्या दृष्टीने आढावा घेतल्यास जगाच्या तुलनेत भारतीय सामाजिक सांस्कृति पहिल्या क्रमांकाची आहे. सामाजिक अभ्यासकांनी भारतीय संस्कृती जतन करण्याचे श्रेय स्त्रियांना जाते असे सिद्ध केले आहे. पाश्चात त्यांनी तौलिक दृष्ट्या विविध देशातील संस्कृतीचा अभ्यास करतानाही भारतीय स्त्रीशक्ती, स्त्री संयम, स्त्री त्याग स्त्री भावना, संबंधी स्त्रिया अशा स्त्री गुणवैशिष्ट्यांचा संस्कृती विकाससात विशेष उल्लेख केला आहे. एकीकडे असे म्हटले जाते की स्त्री स्वाभिमानाला स्त्री अस्तित्वाला स्त्री चरित्राला धक्का पोहोचविण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर ती स्त्री चंडीकेचे रूप धारण करायला घाबरत नाही व समोरच्याला संपवायला भीत नाही तर दुसरीकडे असे म्हणतात की स्त्री त्याग मूर्ती, सहनशक्ती या तिच्या गुणाद्वारे कठोर अपराधासाठी पुरुषांना माफ करण्याचा मोठेपणा दाखवू शकते. स्वामी विवेकानंद भारतीय महिला संबंधी बोलताना म्हणाले होते की जोपर्यंत महिलांच्या स्थितीमध्ये सुधारणा होणार नाही तोपर्यंत या विश्व कल्याण होऊ शकणार नाही कोणत्याही पक्षाला एका पंखाने उडणे कदापि शक्य Catch नाही हे त्यांचे उद्गार अतिशय मार्मिक आहेत. स्त्री शिक्षण स्त्रिया मधली जागृती तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या भारतीय स्त्री आज सर्व क्षेत्रांमध्ये सर्वोच्च स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहे याच पार्श्वभूमीवर 20 व्या शतकात तिचे भारतीय विकासातील नेमके स्थान काय असेल याचा वेध घेताना असे लक्षात आले की, 19व्या शतक हे स्त्रियांना कुटुंब स्थान व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी खर्ची पडले या शतकाच्या प्रारंभ ज्योतिबा फुले महर्षी कर्वे आगरकर आधी पुरुषांनी स्त्री सुधारणा व स्त्री उन्नतीसाठी आता प्रयत्न केले. त्यांच्या कष्टप्रत प्रयत्नातून स्त्रियांना आत्मबळ प्रगट करण्याची शक्ती प्राप्त होऊन कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे विश्व शतकात स्त्रियांचं कुटुंबातील आणि पर्यायाने समाजातील स्थान उंचावलं, म्हणून राष्ट्र उन्नतीसाठी स्त्री भूमिकेची दखल घेणे मला गरजेचे वाटू लागले.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.85
Download Full Article from below:
राष्ट्र उन्नती मध्ये कर्तव्यसिद्ध महिलांचे योगदान
Pages:438-443