Author(s): प्रा. सचिन जयस्वाल
प्रस्तावना: भारतीय राज्यघटनेने स्त्री – पुरुष समानतेचे तत्व स्वीकारले आहे. त्यानुसार महिलांना समान दर्जा दिला आहे. एक व्यक्ती एक मत हे तत्व लागू केले असून प्रत्येक मताचे मूल्य हे समान असते. स्वताला प्रगत समजल्या जाणार्या अमेरिकेत सुद्धा महिलांना मतदानाचा अधिकार हा सहजा सहजी मिळाला नाही. त्यांना त्यासाठी फार मोठा लढा आणि संघर्ष करावा लागलेला आहे. भारतीय समाजातील महिलांना मतदानाचा, पक्ष स्थापन करण्याचा तसेच निवडणुक लढवण्याचा समान हक्क प्राप्त झालेला आहे.
भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन यांनी 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला. अगदी तेव्हापासून पंचायत राज व्यवस्थेस सुरुवात झाली आहे, पण मध्यंतरीच्या काळात त्याला अपेक्षित यश प्राप्त झाले नसल्याचे दिसून येते. मात्र वर्तमान काळात जर बघितले तर आपल्या असे लक्षात येते की, ग्रामीण भागातील राजकारणात महिलांचा टक्का हा पूर्वी पेक्षा नक्कीच वाढल्याचे दिसून येते. त्याला कारणे अनेक आहेत.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.84
Download Full Article from below:
ग्रामीण भागातील महिलांचा राजकारणातील सहभाग
Pages:434-437