Author(s): प्रा. डॉ. पूनम मधुकर गहुकर
गोषवारा: दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा । पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा।।
अनेक संकटांवर मात करून एक सामान्य स्त्रीपासून भारताचे सर्वोच्च पद भूषविणाऱ्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा जीवन प्रवास अत्यंत रोमांचकारी व खडतर आहे. जिद्दीने एक-एक पाऊल पुढे टाकत राष्ट्रपती पदापर्यंत त्यांनी यशाचे शिखर गाठले. महिला व अनुसूचित जमातीतील पहिल्या महिला राष्ट्रपती असून त्या सर्वात कमी वयाच्या असणाऱ्या भारताच्या प्रथम नागरिक आहेत. एका सामान्य आदिवासी कुटुंबातून असून कोणतेही पाठबळ नसून स्वतःच्या बळावर भारताचा प्रथम नागरिक होण्याचा बहुमान त्यांनी मिळविला, ही सर्व भारतीयांसाठी अतिशय गौरवास्पद बाब आहे, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. अतिशय अनाकलनीय घटना त्यांच्याबरोबर घडल्या. नैराश्याने ग्रासलेल्या विळख्यातून बाहेर निघून त्या नव्या उमेदीने उभ्या राहिल्या. हा सर्वांकरीता अतिशय कुतूहलाचाच विषय आहे, त्यांचे जीवनकार्य ही सर्वांकरीता प्रेरणादायी ठरणार आहे, आपण या संशोधन पत्रिकेमध्ये महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा राजकीय प्रवास जाणून घेणार आहोत.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.81
Download Full Article from below:
“राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जीवन प्रवास” एक अध्ययन
Pages:417-421