Author(s): डॉ. मनिषा यादव
प्रस्तावना: कौटुंबिक हिंसाचार हा दिवसेंदिवस जटील प्रश्न बनत चालला आहे, आज महिलावर होणारा हिंसाचार हा उग्र रूप धारण करीत आहे कौटुंबिक हिंसाचार म्हणजे घरगुती वातावरणात होणारी हिंसा होय यामध्ये महिलेस शिवीगाळ करणे, धमकी देणे , आर्थिक प्रकारची छाळवणून करणे , शाब्दिक हिंसा करणे, भावनिकरीत्या दुखावणे या सर्वांचा समावेश होतो अशा हिंसा वारंवार झाल्याने महिला शारीरिक व मानसिकरीत्या विकलांग झाल्याने भावी पिढी निर्मितीत बाध्य येईल व झाली तरी ती निकोप व होणार नाही याकरिता कौटुंबिक हिंसेला वेळीच लगाम बसणे महत्वाचे आहे. कौटुंबिक वातावरण, घरातील संस्कृती चांगली असेल तर महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागत नाही स्त्री पुरुष समता, एकमेकांच्या आदर मानसन्मान , एकमेकाप्रती प्रेम, आपुलकी, आधुनिक पुरोगामी विचारसरणी, स्त्रीमध्ये आई, बहिण हि नाती प्रत्येक पुरुषाने पाहिल्यास स्त्रीला कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागणार नाही. स्त्रीला शारीरिक, शाब्दिक, लैगिंक, मानसिक आर्थिक, हत्या छळले जाते स्त्रीला अपत्य नसेल तर तीला सतत हिणवले जाते, धमकावले जाते, तसेच तिला तिचा जीव देण्यासाठी भाग पडले जाते. त्यामुळे स्त्रीच्या अस्तित्वासाठी कौटुंबिक हिंसाचार कायदे करण्यात आले आहे तरीही स्त्रीची होणारी हिंसा कमी झालेली दिसत नाही. स्त्रीयांची सार्वजनिक ठिकाणी व कुटुंबात होणारी हिंसा हि वाढत असलेली दिसते स्त्री आर्थिक दृष्ट्या परावलंबी असल्याने तिला अशा प्रकारच्या हिंसेला सामोरे जावे लागते. कमवत्या स्त्रीयापेक्षा आर्थिक दृष्टया परवलंबी स्त्रिया कौटुंबिक हिंसाचारला जास्त बळी पाडतात. स्त्रियांना सासर माहेर या दोन्हीचा आधार नसेल तर स्त्री आपला जीव देखील गमवतांना दिसते आधुनिक काळात स्त्री सैनिक होऊन सीमेवर लढते. चांद्रयान , मंगळयान मोहिमेत सहभागी होते. पण तितकेच तिचे शोषणही होताना दिसून येते. शेतकाम करणाऱ्या स्त्रियांना तर पुरुषाच्या तुलनेत कमी वेतन दिले जाते. सरकारी ऑफिस सोडले तर स्त्री व पुरुष यांच्या वेतनातही मोठा फरक आहे. “स्त्री बॉस” हि संकल्पना आपणाकडे फारशी रुजलेली नाही. त्याचप्रमाणे राजकारणातही स्त्रियाचे प्रमाण पुरुष प्रतिनिधीच्या तुलनेत कमी असलेले दिसते. त्यामुळे स्त्रीयांसाठी लागणारे कायदे “पुरुषी मानसिकता” समोर ठेवून केले जातात. याचा फारसा उपयोग महिलांना होत नाही. त्यामुळे हुंड्याची मागणी राजरोसपणे केली जाते. महिलांना तिचे स्वत:तचे असणारे उत्पन्न, तिचे स्त्रीधन, तिची मालमत्ता, आर्थिक व्यवहार या तिच्या अधिकारापासून वंचित ठेवले जाते प्रसंगी तिला घराबाहेर हाकलले जाते. भारतीय संविधानाच्या कलम १४ ते१८ नुसार स्त्री पुरुष समान आहेत. जे अधिकार पुरुषाला आहेत तेच अधिकार स्त्रिला दिले आहेत. तरीही स्त्री पुरुष भेदभाव राजरोसपणे दिसतो कधी कधी तर स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध गर्भधारण करायला भाग पडले जाते तर लिंगनिदान करण्यासाठी सक्ती केली जाते तर गर्भपात कारायला भाग पडले जाते अशा परिस्थितीत स्त्रीच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.71
Download Full Article from below:
स्त्री व पुरुष यांच्यावर होणारा कौटुंबिक हिंसाचार
Pages:358-360