Author(s): डॉ. पदमानंद मनोहर तायडे
प्रस्तावना: स्त्री विश्वाची निर्माती आहे. प्रत्येक देशाच्या उभारणीमध्ये पुरूषांइतकाच स्त्रीचा वाटा महत्त्वाचा आहे. इतिहासाकडे बघितले असता अनेक कर्तुत्वान स्त्रियांचे दाखले आपल्याला सापडतील. मानवी अपत्य निर्मितीमधील प्राथमिक टप्प्यावर स्त्रियांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. कारण अपत्य निर्मितीमधील पुरूषाचा सहभाग पुरूषाला माहित नव्हता. नवनिर्मितीची क्षमता फक्त पृथ्वी आणि स्त्री यांच्यातच आहे, अशी पुरूषांची भावना होती. त्यामुळेच या कालखंडातील देवता स्त्री प्रतिमेद्वारे चित्रीत करण्यात आलेल्या दिसतात. मात्र काळाच्या ओघात नांगराच्या शेतीच्या उदयानंतर तसेच अपत्य निर्मिती मधील पुरूषाचे स्थान स्पष्ट झाल्यानंतर स्त्रियांचे स्थान गौण ठरविण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या कालखंडात स्त्रियांच्या शोषणाचे अनेक पुरावे सापडतात. एकोणिसाव्या शतकापर्यंत स्त्रियांचा दर्जा प्रचंड खालावलेला होता. भारतात स्त्रियांच्या बाबतीत पुर्वीपासून दुय्यमतेची वर्तणूक ठेवण्यात आली आहे.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.70
Download Full Article from below:
भारतातील स्त्रियांच्या समस्या, कायदे आणि वर्तमान स्थितीचे समाजशास्त्रीय अध्ययन
Pages:352-357