Author(s): डॉ. अनिल रा. कडू
गोषवारा: भारतात पुरुषसत्ताक समाज व्यवस्था असताना देखील 1982 सालीपासून या व्यवस्थेला हादरा देणारे कार्य आपल्या समाजातील काही कर्तृत्ववान महिलांनी सुरू केले. महिलांनी चूल आणि मुल यांच्या पलीकडे जाऊ नये अशी व्यवस्था असताना महिलांनाही समाजात मानाने जगता आले पाहिजे. आपल्या हक्कांची जपणूक करताना आपल्या सुप्त गुणांच्या आधारे विकास करता आला पाहिजे. या प्रबळ विद्रोही विचाराच्या जोरावर अनेक महिलांनी एकमेकींच्या आधारे समाजात संघटितपणाचे जाळे उभे केले. यातूनच, पुढे स्त्री संघटना सारख्या हक्कांची जाणीव मिळून देणाऱ्या चळवळी निर्माण झाल्या. समाजात, कुटुंबात आपला हक्क मिळवल्यानंतर त्या संघटित व सक्षम महिलांनी वेगवेगळे प्रांत पादाक्रांत कराव्यास सुरुवात केली.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.68
Download Full Article from below:
महिला सक्षमीकरण - एक वास्तव
Pages:338-343