Author(s): जयश्री देविदास जोशी (सहस्त्रुध्दे)
प्रस्तावना: सक्षमीकरण म्हणजे काय ? हा प्रश्न प्राथमिक, मूलभूत, पण अत्यंत महत्त्वाचा वाटतो. सक्षमीकरण ही बहुआयामी, प्रक्रियात्मक, सृजनशील, आणि प्रवाही संकल्पना आहे, कोणत्याही समाज घटकाला समाज मान्यता, प्रतिष्ठा, स्वातंत्र्य, समता आणि न्याय मिळवून देण्यासाठी तसेच समाजातील विषमता, दारिद्र्य, लिंग, वर्ण, वर्ग, वंश, धर्म इत्यादी प्रकारचे भेद तसेच जातीभेदाचे समोर उच्चाटन करण्यासाठी जी क्षमता त्या अपेक्षित शोषित समाज घटकास आणावी लागते. ते म्हणजे सक्षमीकरण असे मला वाटते. मग तो समाज घटक अस्पृश्य, दलित, पीडित, आदिवासी किंवा महिला कोणीही असो. कोणत्याही समाजात प्रबोधनाची सुरुवात ही त्या समाजात वावरणाऱ्या संवेदनशील व बुद्धिजीवी समूहाच्या कृतीयुक्ती मधून होत असते.१५ व्या शतकात युरोपात तर १८ व १९ व्या शतकात भारतात तसेच महाराष्ट्रात प्रबोधनाचे पडसाद उमटायला प्रारंभ झाला. पाश्चिमात्य उदारमतवादी तत्त्वाचा प्रभाव येथील प्रबोधनावर निश्चितच पडला. समाज परिवर्तनशील, संवेदनशील आणि अनुकरणप्रिय असल्यामुळे या परिवर्तनाचे आयाम, प्रश्न, उपाय, भूमिका, निरनिराळे घटक हे देखील बदलण्यास सुरुवात झाली.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.66
Download Full Article from below:
सामाजिक राजकीय संपर्कात महिला सक्षमीकरण
Pages:324-330