Author(s): डॉ. गणेश बाबुराव दराडे१, उद्धव त्रिंबक बडे२
सारांश (गोषवारा): संपुर्ण जगामध्ये महिला सबलीकरण हा विषय महत्वाचा विषय म्हणून समोर आला आहे. स्त्री सबलीकरणासाठी जागतिक पातळीवर, राज्यपातळीवर, गावपातळीवर, शासकीय, प्रशासकीय, सामाजिक, राजकीय क्षेत्रात घटनात्मक तरतुदी करुन त्यांची अमंलबजावणी केल्यास स्त्री सबलीकरणाला चालना मिळेल. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 50 टक्के आरक्षण प्रदान करुन महिलांना सबलीकरणाच्या माध्यमातुन समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. याच धर्तीवर सुरु करण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना ही एक महत्वपूर्ण योजना आहे. कन्या ही सुकन्या ठरावी म्हणून केंद्र सरकारने अध्यादेश काढून 22 जानेवारी 2015 साली माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “बेटी बचाओ बेटी पढाओ” या अभियानाअंतर्गत मुलींसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरु केली आहे ज्या योजनेला सुकन्या समृध्दी योजना असे म्हणतात. महिला सबलीकरणाचा हा एक महत्वाचा पैलू ठरेल.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.63
Download Full Article from below:
माहिलांचे सबलीकरण आणि सुकन्या समृद्धी योजना
Pages:309-313