Author(s): Prof. Dr. Sunil Parise
प्रस्तावणा: महिला सर्वच क्षेञात अग्रेसर आहे तसेच महिला पुरूषांच्या खांदयाला खांदा लावुन काम करत आहे. केवळ चूल आणी मूल या पुरते मर्यादित न राहता महिलांनी भरारी घेतलेली आहे. महिला आणी पुरूष हा भेद कमी झाला असला तरी समाजात आजही काही ठिकाणी महिलांना वेगळी वागणूक दिली जात असल्याचे लक्षात येते. महिला म्हटले की, त्या नाजूक आणी त्यांना काहीही जमत नाही असे समजले जात असले तरी याच समाजात राहुन महिलांनी स्वतः त्यांची ओळख निर्माण केल्याचे चिञ दिसत आहे. खेडयापाडयातील तांडा वस्तीतील शहरातील महिला सक्षमीकरणा करीता धडपड करतांना दिसत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, राजकारण, समाजकारण याही क्षेञात महिलांची प्रगती होतांना दिसत आहे. स्वतःहाची बौध्दीक पातळी ओळखून अनेक क्षेञात नावलौकीक मिळविण्या करीता कार्य करत आहेत. महिला सक्षमीकरण महिलांना ते बळ देते जे त्यांना त्यांच्या हक्कासाठी लढण्यास मदत करते. एकविसावे शतक हे स्ञीच्या जीवनातील आनंदी व स्वावलंबी राहण्याचे शतक आहे. महिला आता जागृत आणी सक्रीय झाल्या आहेत. जेव्हा एखादी स्ञी तीच्यावर लादलेल्या बेडया आणी बंधनं तोडायला लागते तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तिला रोखू शकत नाही. अजुनही शिक्षण आणी मुक्तपणे काम करण्यासाठी सुरक्षित प्रवास सुरक्षित काम आणि सामाजिक स्वातंञा करीता समर्थनाची गरज आहे. महिला सक्षमीकरणाचे हे कार्य अत्यंत महत्वाचे आहे कारण भारताची सामाजिक आर्थिक प्रगती ही महिलांच्या सामाजिक आर्थिक प्रगतीवर अवलंबुन आहे.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.57
Download Full Article from below:
संगीत क्षेञात महिलांचे सक्षमीकरण आणी योगदान
Pages:280-286