Author(s): प्रा. डॉ. रेखा दिगांबर अढाव
सारांश: मराठी साहित्यामध्ये वाचन, लेखन परंपरा अतिशय समृध्द अशी परंपरा आहे. मराठी साहित्यामध्ये संहिता लेखन आणि संहिता संपादन ही उच्च आणि श्रेष्ठ प्रतीचकौशल्य आहेत. या कौशल्यांना प्राप्त करण्यासाठी प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला अतिशय जबाबदारीने आणि चतुरस्त्रपणे ,अभ्यासपूर्ण पद्धतीने स्वतःला तयार करावे लागते.संहिता लेखनासारखे अतिशय नाजूक आणि तितकेच नजाकतदार काम करण्यासाठी संहिता लेखकाला एकंदरीतच मानव जातीचा, समाज जीवनाचा आणि साहित्याचा अभ्यास असणे अनिवार्य आहे. संहिता संपादन करणारी व्यक्ती ही निकोप दृष्टिकोन असणारी असल्यास अतिशय उच्च दर्जाच्या संहिता संपादनाचे काम त्यांच्या हातून सहजच होऊ शकते .आज आपण मराठी साहित्यामध्ये साहित्य लेखन आणि संहिता संपादनामध्ये अनेक दिग्गजांनी केलेले काम वाचतो, बघतो. सिनेसृष्टीत तर संहिता लेखनाला अतिशय महत्त्व आहे .मराठी साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साहित्यप्रकार आपल्या दृष्टीस पडतात. प्रत्येक लेखक त्याच्या विचार, भावनेतील मजकूर पेनाच्या साहाय्याने कागदावर उतरवतो. मात्र संहिता संपादक लेखकाच्या मजकूराला वाचकांपर्यंत पोहोचवतांना त्याच्यावर नाना प्रकारचे संस्कार करून लेखकाच्या लेखनाला सौंदर्य प्राप्त करून देतो..
DOI:10.61165/sk.publisher.script.writing.2024.58
Download Full Article from below:
संहिता लेखन, संहिता संपादन एक कौशल्य
Pages:289-295
