Author(s): प्रा. डॉ. श्रीकृष्ण गो. काकडे१, निलेश उद्धवराव पाकदुने २
संहिता या शब्दाला स्क्रिप्ट असा पर्याय शब्द वापरला जातो. साधारणपणे कोणतीही लिखित गद्य व पद्य म्हणजे संहिता असे आपण म्हणतो .चित्रपट , नाटक , संगीत-नाटक , चित्र नाट्य , लोकनाट्य , या आणि अशा कितीतरी प्रकारांमधधे संहिता गरजेची असते.संहिते शिवाय कुठलीही कलाकृती म्हणजे समुद्रातील वादळात नावाड्याशिवाय असलेली नाव होय. जहाजाला योग्य दिशा देण्यासाठी जशी कसलेल्या नावाड्याची गरज असते अगदी त्याचप्रमाणे नाटकाची असो वा चित्रपटाची संहिता हीच प्रेक्षकरुपी समुद्रातून पैलतीर गाठण्यासाठी नावाड्याची प्रमुख भूमिका बजावत असते. मराठी विश्वकोशात संहिता या शब्दाचा अर्थ 'एकत्र ठेवणे ' असा दिला आहे. व्याकरणाच्या परंपरेत हा शब्द संज्ञा म्हणजेच सांकेतीक अर्थाने वापरतात.संहिता या शब्दाला मंत्रातील पदे , पद पाठ ,संहिता पाठ , असे देखील पर्यायी शब्द वापरले जातात. थोडक्यात , संहिता म्हणजे पद किंवा पदांची विकृती होय .जे जे लिखित साहित्य आहे मग ते गद्य असो वा पद्य संहिता या प्रकारात मोडते. जोपर्यंत लिहिलेल्या संहितेचे रंगमंचावर वा पडद्यावर सादरीकरण होत नाही तोपर्यंतच लिखित संहितेला साहित्याचा दर्जा प्राप्त असतो. संहितेवर अनेक संस्कार करून नंतरच त्यातून त्या त्या कलाकृती जन्माला येतात. नाटकाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर नाटककाराने लिहिलेली संहिता ही दृक् -श्राव्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर सादर होत असते म्हणूनच नाटककार नाटक आणि नाटकाची संहिता हे अत्यंत महत्त्वाचे घटक ठरतात.यातील एका एका घटकाचा पुढील प्रमाणे विचार करता येईल.
DOI:10.61165/sk.publisher.script.writing.2024.50
Download Full Article from below:
नाटक, नाटककार आणि संहिता लेखन
Pages:251-255
