Author(s): सुरेखा बाबुराव नागरे१, प्रा. डॉ. पौर्णिमा बोडके२
गोषवारा: चित्रपट कला एक कला आणि एक मनोरंजनाचे माध्यम म्हणून माणसाच्या अधिक जवळचे आहे स्थापत्यकला, मूर्तीकला, चित्रकला, नृत्यकला, शिल्पकला, साहित्यकला, या सर्व ललितकलांना आपल्यामध्ये समाविष्ट करून घेणारी चित्रपट एक व्यापक कला आहे. चित्रपट हे यंत्र युगातील माध्यम आहे. चित्रपट हे माध्यम लिखित संहितेला कॅमेरा(दृश्यक) माध्यमाच्या सहाय्याने दृश्य प्रतिमेत रूपांतरित करते. लिखित साहित्य चित्रपटाचा गाभा असून तिला पटकथा असे संबोधण्यात येते. पटकथा लेखनामध्ये नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहे. पटकथा लेखन म्हणजे गोष्टीला दिलेले संवादात्मक रूप, डिजिटल प्लॅटफॉर्म संवादातून गोष्टी सांगणे सोयीचे होते. फेसबुक, युट्युब, व्हिडिओज, लघुपट, माहितीपट यासाठी पटकथा लेखनाचा वापर केला जात आहे. पटकथा लेखन सारखे विषय अध्ययनात समाविष्ट केलेले आहे. विद्यार्थ्यांना पटकथा लेखनातून रोजगाराच्या संधी दिसू लागल्या आहे. या दृष्टीने पटकथेचे स्वरूप, पटकथेचे महत्त्व, पटकथेचे घटक, दृश्यसंहिता यांची मांडणी प्रस्तुत शोधनिबंधामध्ये केली आहे.
DOI:10.61165/sk.publisher.script.writing.2024.49
Download Full Article from below:
पटकथेचे घटक,पटकथेच्या दृश्यसंहिता (स्क्रीन प्ले)
Pages:245-250
