Author(s): निलेश श्रीकृष्ण कवडे१, प्रा. डॉ. शिवाजी नागरे२
प्रस्तावना : औद्योगिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर चित्रपट कला उदयाला आली. हळूहळू तिचा विकास झाला. १९१२ मध्ये दादासाहेब तोरणे आणि दादासाहेब फाळके यांच्या चित्रपट निर्मितीने भारतीय संस्कृतीचे विषय असलेली चित्रपट संस्कृती निर्माण झाली. आधी मूकपट असलेल्या चित्रपटांना ध्वनीची जोड मिळाली. आजच्या संगणकीय काळात चित्रपटाच्या माध्यम आणि आशय द्रव्यांमध्ये आमूलाग्र बदल होत चालले आहेत. चित्रपट चळवळीतून माहितीपटाचा जन्म झाला. माहितीपट हा लघुचित्रपटापेक्षा वेगळा असतो. माहितीपटाच्या माध्यमातून संबंधित विषयाबाबत माहिती विस्तृतपणे आणि कल्पकतेने दिली जाते. ही माहिती देण्यासाठी माहितीपटाची संहिता लिहिली जाते. माहितीपट बनवताना पहिली पायरी म्हणजे माहितीपटाची संहिता लेखन होय. माहितीपट ही चित्रपटाची सूक्ष्म शैली असते. माहितीपट व्हिडिओ कॅमेरा वर्क पार्श्व संगीत आवाज छायाचित्र दृश्य यांचा संदर्भ घेऊन बनवला जातो. संहिता आणि इतर तांत्रिक बाबी यांचे संपादन केल्यावर माहितीपट पूर्ण होतो.
मुख्य शब्द: संहिता, माहितीपट, लघु चित्रपट, डॉक्यू-ड्रामा.
DOI:10.61165/sk.publisher.script.writing.2024.43
Download Full Article from below:
माहितीपटाचे संहिता लेखन
Pages:198-210
