Author(s): महादेव उद्धव ढाकणे१, डॉ. भगवान गरुडे२
गोषवारा: अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच आरोग्य आणि शिक्षण या मानवाच्या महत्त्वाच्या गरजा आहेत. शिक्षण म्हणजे काय? शिक्षण कशासाठी? याचा विचार फारसा गांभीर्याने केला जात नाही. “शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकासाचे साधन, व्यक्तिमत्व विकासाची संधी.” “विचारपूर्वक, जाणीवपूर्वक, डोळसपणे जगण्याची जबाबदारी म्हणजे शिक्षण.” शिक्षण हे मानवी जीवनात परिवर्तनासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. शिक्षणामुळे बौद्धिक उन्नती होते. त्यातून जीवन सुखमय करणारी प्रगती साध्य करता येते. स्त्री शिक्षणासाठी भारतात दारिद्र्य, पुरुषसत्ताक कुटुंबपद्धती, बालविवाह पद्धती, समाजाची मानसिकता इत्यादी अनेक प्रकारचे अडथळे येतात. परंतु ते अडथळे स्त्रिया समाजसुधारकांच्या प्रयत्नाच्या अभ्यासातून, शिक्षक व प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून पार पाडतात व शिक्षण घेतात त्याचेच फलित म्हणजे इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, सुषमा स्वराज, निर्मला सीतारमन, कल्पना चावला इत्यादी होत. सदर संशोधनासाठी संदर्भग्रंथ, इंटरनेट, मासिके, साप्ताहिके व वर्तमानपत्रे या दुय्यम माहिती स्रोतांचा आधार घेण्यात आलेला आहे. प्रस्तुत संशोधन लेखात “भारतीय स्त्री आणि शिक्षण” या संदर्भात विचार मांडण्यात आलेले असून त्यासाठी वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.89
Download Full Article from below:
भारतीय स्त्रियांचे शैक्षणिक सक्षमीकरण
Pages:461-465